परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक मराठी विभाग प्रमुख डॉ. हरिश्चंद्र गायकवाड यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने   पीएचडी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना मिळालेल्या नियुक्तीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा सावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

सदरील कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता.या सत्कार समारंभ प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदांशिवे ,प्राणी शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे ,परीक्षा प्रमुख डॉ.प्रशांत गायकवाड ,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सचिन चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

 
Top