उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

प्रेरणा ग्रुप व भानूनगर येथील रहिवाशी यांचे संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सिद्धगणेश मंदिरात पार पडला. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री.मधुकरराव तावडे   हे होते.सुत्रसंचालन प्रेरणा ग्रुपचे अध्यक्ष  नितीनराव तावडे यांनी केले. प्रथम गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.त्यानंतर समितीचे नुतन अध्यक्ष श्री.शशिकांत खुने यांचा सत्कार  मधुकरराव तावडे बप्पा यांनी शाल,फेटा,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष  धर्मराज सुर्यवंशी यांचा सत्कार श्री.नितीनराव तावडे यांनी केला तर सचिव   दत्तात्रय साळुंके यांचा सत्कार  सचिन  तावडे यांनी केला.इतर पदाधिकारी  निशिकांत खोचरे, सुनिल मिसाळ,रियाज शेख,विकास जाधव,धनंजय साळुंके,  गुंडोपंत जोशी गुरूजी,यांचाही सत्कार समारंभ पार पडला.या कार्यक्रमास मधुकरराव तावडे बप्पा, नितीनराव तावडे , सचिन भैय्या तावडे आदींची उपस्थिती होती. 


 
Top