तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर घाटशिळ वाहन तळातुन भाविकांना श्रीतुळजाभवानी मंदीरात सोडले जाणार असल्याने येथे सर्वसुविधांनयुक्त  तात्पुरता मंडप तसेच विविध केंद्र स्टाँल  उभारणी काम अंतिम टप्प्यात आले आहे.

श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवराञ उत्सवात देवी भक्तांना राजेशहाजी महाध्दार मधुन मंदीरात न सोडता घाटशिळ जवळील वाहन तळातुन दर्शन मंडपात व तेथुन गर्भगृहात सोडण्यात येणार आहे .  घाटशिळ वाहन तळात ८० बाय २५० फुटाचे दोन वाँटरप्रुफ स्ट्रँक्चलर  मंडप उभारले जात आहे येथे एका मंडपात २०  हजार भाविक थांबु शकतात पण सध्या कोरोनामुळे येथे कमी भाविकांना थांबवले जाणार आहे.

येथे  उकाड्या पासुन सुटका व्हावी म्हणून वर विद्युत पंखे जमिनीवर मँटींग अंथरली जाणार आहे तसेच पाणापोयी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे व या परिसरात पोलिस नियंत्रण कक्ष, प्रथमाेपचार कक्ष, चप्पल स्टँड, आपत्ती व्यवस्थापन, कक्ष स्वछतागृह, शौचालय उभारली जात आहे . 


 
Top