उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती   संपुर्ण भारतातच नव्हे तर जगभरात  साजरी करण्यात येते. जिल्हयातील वाघोली या गावात महात्मा गांधीजी यांच्या पुर्णाकृती पुतळा असुन आज त्यांच्या जयंती निमीत्त भाजपाचे तुळजापुर विधान सभा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वाघोलीतील बापुजींच्या पुतळयास पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच वाघोली गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास ही पुष्पहार अपर्ण करण्यात आले आणि नंतर गावातुन तिरंगा ध्वज हातात घेऊन देशभक्तीपर घोषणा देत समस्त ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी यांच्या सोबत तिरंगा रॅली काढण्यात आली.

 या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड खंडेराव चौरे, रामदास कोळगे, जिल्हा समनव्यक नेताजी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, राजाभाऊ पाटील, वाघोली गावातील ओमप्रकाश मगर, सतिश खडके, प्रदिप पाटील, बाळासाहेब पवार, परमेश्वर पाटील, दिलीप पाटील, प्रकाश मगर, प्रशांत शिनगारे, उमेश वसंत मगर, अमोल पवार, महेश उंबरे, आनंद खडके, दिनेश उंबरे, सुशील खडके, नाना माळी, रोहन पाटील  तसेच गावातील भाजपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top