तुळजापूर / प्रतिनिधी-

आठवी ते बारावी पर्यतची शाळा ४ आँक्टोबर पासुन सुरु होणार  असल्याच्या पार्श्वभूमीवर  पुर्ततयारी साठी तुळजापूरात शनिवार  दि  1 ऑक्टोबर 2021 रोजी शहरातील पंचवीस शाळांच्या मुख्याघ्यापकांची बैठक होवुन शाळा सुरु करताना काय दक्षता यावर चर्चा करण्यात आली.

 शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर 2021 नुसार कोव्हीड च्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने शहरातील 25 मुख्याध्यापकांना गट शिक्षण कार्यालय,तुळजापूर यांच्या वतीने श्रीम. शिंदे डी.एस.मॅडम विस्तार अधिकारी ग्रामीण यांनी तसेच केंद्रप्रमुख श्री. ऋषिदादा भोसले, विषयतज्ञ श्री.बाबासाहेब अंकुशे यांनी शासन निर्णय वाचन करून मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी या विषयी चर्चा केली.  श्रीम. शिंदे डी.एस.यांनी शहरातील शिष्यवृत्ती, नवोदय अशा विविध स्पर्धा परीक्षांचा आढावा घेऊन स्पर्धा परीक्षा पासून  विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या.नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 ची यशोगाथा ही सहशिक्षक श्री.शेंडगे ए.बी. यांनी सांगीतली. नगर परिषद तुळजापूरच्या उपसभापती श्रीम. मंजुषा देशमाने यांनी मार्गदर्शक श्री.शिंदे डी एस मॅडम चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 सदर बैठकीसाठी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3,तुळजापूर चे मुख्याध्यापक श्री.मोटे टी.डी.,सहशिक्षक श्री. शेंडगे ए.बी. ,श्री.साळुंके बी.एस.श्री.राऊत जे  एन.,श्री निडवंचे व्ही.ए. श्रीम .गायकवाड एन .बी.,श्रीम. कुलकर्णी एन.बी.तसेच श्रीमती कल्पना व्हटकर, श्रीम.मीना वाळा,श्री. दिपक माळी यांनी परिश्रम घेतले.


 
Top