उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्यामार्फत वखार महामंडळ आपल्या दारी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमाची प्रस्तावना सचिन कुंभार विभागीय व्यवस्थापक लातूर एम सी डी सी पुणे यांनी केली कार्यक्रमाला सविस्तर मार्गदर्शन श्री कुमार पवार यांनी केले तसेच  भाऊसाहेब टेम गर   साहेब राज्य सल्लागार एससीडीसी तसेच   मधुकर सूर्यवंशी  स्मार्ट प्रकल्प अधिकारी एम एस डब्ल्यू सी पुणे यांचे मार्गदर्शन लाभले आत्माचे श्रीअजित  माने  यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 सदर कार्यक्रमाला उस्मानाबाद जिल्ह्यातून 95 प्रतिनिधी उपस्थित राहिले होतेे. कार्यक्रमास श्री अभिलाष लोमटे सचिव एकता परिवार  यांचे सहकार्य लाभले शेवटी  साठाअधीक्षक कलशेट्टी साहेबांनी शेतमाल साठविणे विषयी सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या सूचना व अडचणी दूर करण्यास कार्यशाळा पूर्ण झाली


 
Top