उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लाल पॅंथर श्रमिक मानवाधिकार संघच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  गायराण अतिक्रमण धारकांचे व निवासी अतिक्रमण धारकांचे जय भिम आंदोलन करण्यात आले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

या निवेदनात असे म्हटले आहे की मराठवाडासह उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय गायराण जमीन व वनजमीनीवरील अतिक्रमण धारकाचे नावे जमीनी करण्यात याव्यात. मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय जमीनीवर निवासी अतिक्रमण करून राहत असलेल्या निवासी अतिक्रमण धारकाच्या नावे प्लॉट करून आहे तेथेच घरकुले बाघून देण्यात यावीत.मौजे वाठवडा येथील मांतग समाजाच्या स्मशानभुगीची नोंद दुरुस्त करून ७/१२ वर नोंद लावण्यात यावीमौजे कडकनाथवाडी ता. कळंब येथील मांतग  समाजाच्या वडीलोपाजीत स्मशानभुमीची नोंद लावण्यात यावी. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मांतग समाज आयोगाची शिफारसी लागू करण्यात याव्यात. सरकारी जागेवर पारधी समाजाने केलेले निवासी अतिक्रमण पारधी समाजाच्या कुटुंबाच्या नावाने करून त्यांना आहे तेथेच घरकुल देण्यात यावेत. या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या  निवेदनावर बजरंग ताटे, माया शिंदे, शंकर काळे, सिकंदर पवार ,लाला शिंदे, कचरू नवगिरे, हनुमंत पाटुळे, पिंटू आरण, इंद्रजीत सगट, जनार्धन बोराडे, रामरतन कांबळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top