उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन सोमवार दि.२५ ऑक्टोबर २०२१ रोजी, मौजे सलगरा दि. ता.तुळजापुर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा नांदुरी व परिसरातील सर्व वयोगटातील ५१० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

या शिबीराचे उद्दघाटन मा.पोलीस पाटील राजाराम लोमटे व उपसरपंच श्री प्रशांक लोमटे यांच्या हसते पार पाडले. यावेळी ग्रा.प.सदस्य जीवन लोमटे, सोमनाथ कोळी, फुलचंद भरगंडे, संतोष साठे, शिवाजी चव्हाण, शिवाजी लोमटे, सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. गायकवाड अविनाश, पूजा मिटकरी, डॉ.मुलाणी, श्रीमती सुतकर, कुणाल मस्के, आशाताई सौ.संजीवनी शिंदे, अबिदा शेख, मिनाक्षी गायकवाड, श्रीमती भालेराव तसेच ग्रा.प.सलगरा येथील कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.परवीन सय्यद, डॉ.आदित्य बोरकर, डॉ.प्रणित गणविर, डॉ.ऋषिकेश जाधव, डॉ.जय गोयल, डॉ.महेश लोया यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच काक्रंबा आरोग्य केंद्राच्या डॉ.रमेश भिसे, आशा कार्यकर्त्या छाया स्वाती, कौशल्या गाडेकर, तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, संदीप चव्हाण, रवी शिंदे, वैभव रेडे ईत्यादींनी परीश्रम घेतले. 


 
Top