उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील सार्थसत्य,शिवशंभूपंढरी वसाहतीत मराठवाडा देवगिरी प्रांत संस्कार भारती समितीच्या सर्वसाधारण सभेत बीड स्थित कलावंत भारत लोळगे यांची देवगिरी प्रांत अध्यक्ष बिनविरोध निवड झाली. उस्मानाबाद जिल्हा प्रवासा दरम्यान संस्कार भारती उस्मानाबाद जिल्हा समितीच्या वतीने भारत लोळगे यांचा शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी देवागिरी प्रांत प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे, प्रा. श्यामराव दहिटणकर उमानाबाद संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हाकोषप्रमुख अरविंद पाटील, जिल्हा संगीतविधाप्रमुख सुरेश  वाघमारेसुंभेकर, शेषनाथ वाघ, पखवाज वादक चंद्रकांत शेळके, तबला वादक नरहरी दळे, सौ. सुदर्शना वाघ , अक्षय भन्साळी, सार्थकी , सत्यहरी वाघ उपस्थित होते. सत्कारानंतर भावगीत, भक्तीगीत, गौवळण गायन भारत लोळगे यांनी केले.


 
Top