तुळजापूर / प्रतिनिधी- 

ओला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे असंवेदनशील आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि निद्रिस्त आघाडी सरकारला खडबडून जागं करण्यासाठी औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा सोमवार  दि . १६  रोजी काक्रंबा (ता.तुळजापूर ) येथे आली असता येथे सरपंच वर्षाताई अनिल बंडगर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन याञेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी उपसरपंच अनिल बंडगर, नारायण नन्नवरे, हरिदास वट्टे, अरविंद कानडे, बाबा श्रीनामे, पदमराज गडदे, उमेश  पाटील, उमेश पांडागळे, रामकृष्ण बचाटे, गौतम सोनटक्के, समाधान हांडे,समाधान मोरे, सचिन बंडगर , अनिल जाधव, सोमनाथ खताळ, विश्वास बंडगर सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थितीत होते


 
Top