तुळजापूर / प्रतिनिधी-

आंध्र प्रदेश मधील श्रीशैल्यम येथील जगदगुरूंच्या  ट्रस्ट वर विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील यांचा तुळजापूर येथे पाटील परिवाराच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अँड. धिरज पाटील यांनी सत्कार केला.

यावेळी गुरुनाथ बडुरें,  रत्नदीप पाटील, गोविंद पाटील, दत्ता चटगे, लक्ष्मण उळेकर, राजू भोसगे  आदी उपस्थित होते. पाटील यांच्या निवडी मुळे श्रीशैल्यम येथे दर्शनासाठी राज्यातील विविध भागातील  मोठ्या संख्येने जाणाऱ्या भाविकांना सोयी उपलब्ध होतील अशी अपेक्षा अँड धिरज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

 
Top