भूम/ प्रतिनिधी-

शेतकरी कामगार , घरेलु कामगार आणि कंत्राटी कामगार यांना स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे ते   बांधकाम कामगार महामंडळ स्तरावर  करुन शासकीय सवलती,सुविधा देण्यात यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी कामगार युनियन चे अध्यक्ष मा सुभाष देसाई ,उपाध्यक्ष विशाल शिंदे, मराठवाडा अध्यक्ष गौस शेख, नांदेडचे शकील शेख आदी च्या वतीने  मा पंतप्रधान,  मा मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री यांना निवेदन करण्यात आली आहे.अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रात प्रथमच अशी स्वतंत्र मंडळाची मागणी केली आहे.

ओल्या आणि सुक्या दुष्काळामध्ये अडकलेल्या शेतक - याला उत्पन्नापासुन वंचित रहावे लागत आहे , उत्पन्न नाही तर पैसा नाही आणि पैसा नसला तर सावकाराचे कर्ज फेडू शकत नाही अशी मजुरांची गाथा आहे .यांना सरकारकडून मिळणा - या पैशाच्या मोबदल्यावर अवलंबुन रहावे लागते शेतकरी मजुरांचा तर पिक जास्त आले आणि त्यास भाव कमी मिळाला तर त्या पिकाची नासाडी केली जाते , यावर आजतागायत काही उपाय झालेला नाही , अश्या परिस्थिती मुळे , शेतकरी कामगार , घरेलु कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्या समस्या एकच , ते म्हणजे मुलाबाळांना लागणारा कपडालत्ता त्यांच्या उच्च शिक्षणासाठी , लग्नकार्यासाठी , औषधउपचारासाठी , अपघात किंवा अपघाती निधनासाठी , प्रसुतीगृहासाठी लागणारा पैसा हा त्यांना अत्यंत महत्वाचा वाटतो त्यासाठी त्यांना उत्पन्नापुढे काहीच दिसत नाही . शासनाने या सर्व गोष्टीचा विचार करावा व त्यासाठी स्वतंत्र महामंडळे तयार करावीत . तसेच केल्यास शासनाचा अर्धा अधिक ताण कमी झाल्यावाचून राहणारा नाही , त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल . सध्याच्या परिस्थितीत हे तिन्ही वर्ग सदर परिस्थितीला तोंड देत आहेत . 

बांधकाम कामगारांप्रमाणे या सवलती जर का  शेतकरी मजुरांना ही  देण्यात आल्या तर या तिन्ही वर्गाचा भार कमी होईल . तसेच महिला मजुरांचाही प्रश्न, शेतक - यांच्या पिकांचा आहे  या साठी शासन त्यांना बियाणाबरोबर पिकविमा मिळवून देण्यास यशस्वी ठरले तर मग शेतकरी सुखावला जाईल . शासनाने सदर गोष्टीचा सखोल विचार करावा आणि या तिन्ही वर्गास स्वतंत्र महामंडळ उभारून न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे

 
Top