परंडा / प्रतिनिधी : -

उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे ऑक्सिजन प्लॅन्टचे उद्घाटन भाजपा प्रदेश, सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

 या उद्घाटन प्रसंगी देशाचं कनखर नेतृत्व पंतप्रधान  नरेंद्र  मोदी हे व्हर्च्यवली उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास २० वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने परंडा उपजिल्हा रुग्णालयातील २०० LPM (liter per minute) इतक्या क्षमतेच्या ऑक्सिजन प्लॅन्ट चे उद्घाटन झाले. सदरील प्लॅन्ट हा हवेतुन ऑक्सिजन तयार करून प्रती मिनिटं २०० ते ५०० लिटर ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला कोवीड व इतर रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

 यावेळी परंडा तहसीलदार श्री. रेणुकादास देवणीकर, डॉ. अब्रार पठाण, डॉ. निलोफर पठाण तसेच परंडा उपजिल्हा रुग्णालयात येथील सर्व डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top