उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी रस्त्यावरील पूल अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेला आहे. या पुलाची राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मंगळवारी (दि.5) पाहणी केली व बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क केला. यावेळी येत्या दोन दिवसात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे आश्वासन घेतले.

हा रस्ता नायगाव पाडोळी, निपाणी, हासेगाव, नागुलगाव, कळंबला जोडला जाणार मुख्य रस्ता आहे. पूल वाहून गेल्यामुळे याठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. शेतकर्‍यांसह नागरिकांना येथून ये-जा करताना जोखीम उचलावी लागत असल्याने या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्याची मागणी येथील नागरिकांसह शेतकर्‍यांनी केली होती. यावेळी  त्यांच्यासमवेत या भागातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी संजय पाटील दुधगावकर यांना विमा, अनुदान याबाबत विचारले असता अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना तात्काळ एकरी 25000 देण्याची मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे विमा कंपनीने  विमा देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बजाज अलायन्स कंपनीकडे विमा भरला आहे. शासनाने तत्काळ विमा मंजूर करून द्यावा यापूढे कंपनीने असाच अन्याय केला तर जिल्ह्यात बजाज अलायन्स विमा कंपनीचे कार्यालय राहणार नाही, असेही यावेळी त्यांनी सांगितले.


 
Top