तेर / प्रतिनिधी

 अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे नागरिकांना अर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी सांगितले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे अशा  नागरिकांच्या घरी जाऊन सक्षणा सलगर यांनी त्यांची विचारपूस केली. तसेच त्यासंदर्भात संबंधित प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली,अशी माहिती  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या .दाऊतपुर  गावात कोळपे दाम्पत्य यांच्या शेताचे प्रचंड  झालेले नुकसान त्यांची  गाय, वासरू अतिवृष्टीमुळे मृत्यू  पावलेले आहेत. 

राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना या संदर्भात भेट घेऊन सरसकट पंचनामे करण्यात यावे अशा पद्धतीचे निवेदन देण्यात येणार आहे तसेच  शरद पवार  यांच्याकडे देखील केंद्राकडून मदत व्हावी म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.अतिवृष्टीग्रस्तअशा अनेक कुटुंबांना त्यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक सहकार्य करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सक्षमता सलगर यांनी दिली.

 
Top