उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा नदीकाठची गावे राजुरी, दाऊतपूर, ईर्ला, रामवाडी कामेगाव या गावातील शेतात प्रत्यक्ष जावुन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केल्यानंतर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मा. मुख्यमंत्री ना. उच्दवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी रु. 50,000/- हेक्टरी तर फळ बागायतदारांना रु. 1,00,000/- हेक्टरी मदत करावी अशी मागणी करण्यात आली.

अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर झाले आहेच त्याबरोबरच जमिनीची माती पूर्णपणे वाहुन गेलेली असुन जमिन नापिक झाल्याचे दिसून आले. अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरिबांचे संसार उघडयावर आले तर काही शेतकऱ्यांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नदीवरील पुलकम बंधारे फुटल्याने वाहतुक बंद झाली आहे. रामवाडी व दाऊतपूर, ईल या गावातील पुलाचे कामे तातडीने सुरु करून वाहतुक सुरळीत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

खरीप हंगाम 2021 चा पिकविमा 100 टक्के मंजुर करून शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई देण्याबाबत विमा कंपन्यांना सुचना द्याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही मा. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचेमार्फत निवेदन देवुन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे.

या दौऱ्यात मा. मधुकरराव चव्हाण साहेबांसोबत जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, संघटक राजेंद्र शेरखाने, कार्याध्यक्ष खलील सय्यद सर, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ बनसोडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत युवक जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, दादा पाटील, मुकुंद पाटील, तालुका उपाध्यक्ष सुभाष हिंगमिरे, सरपंच विष्णु भौरे, अलिक याधमारे, दयानंद केसकर, अशोक शिंदे, शिवाजी चौगुले, सरपंच वाणेवाडी बळीराम उंबरे, दाऊतपूर सरपंच शिंदे, उपसरपंच कानिफनाथ भांगे, ईश्वर गिरी, सर्जेराव जाधव उपसरपंषहरुण पटेल, नंदू विरसागर, पांडुरंग याकुरे, हनुमंत हाजगुडे, दत्ता कत्तबे, दत्तुबा हाजगुडे, सलमान शेख, अकबर शेख बाबा देडे आदि प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top