तुळजापूर / प्रतिनिधी-

अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथून तुळजाभवानी देवीच्या सीमोल्लंघन सोहळ्यासाठी आलेल्या पलंग पालखीचे स्वागत तिर्थक्षेञ तुळजापूरात  रांगोळ्यांच्या पायघडीवरुन झाले. यासाठी  संभाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते.रांगोळी संस्कार भारती शाखेने काढली होती.

संभाजी तरुण मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी येणाऱ्या पलंग पालखीचे जोरदार स्वागत शुक्रवार पेठ पाण्याची टाकी येथे केले जाते. यामध्ये संस्कार भारतीच्या कलावंतांची रांगोळी काढण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी विनोद गंगणे, विशाल छत्रे, राम छत्रे, नंदकुमार डाके, अंकुश हाके, अमित आडगळे, आकाश छत्रे , राजा भाऊ घाटे, ज्योतिबा झाडपिडे, विशाल काचोळे, महेश गरड, समाधान माळी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

यानिमित्ताने येथील संभाजी तरुण मंडळाच्यावतीने  संस्कार भारतीच्या सर्व रांगोळी कलाकारांचा फेटा बांधून श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. सलग १६  वर्षापासून ही रांगोळी येथे प्रतिवर्षी पलंग पालखीच्या स्वागतासाठी काढली जाते. यावर्षी २० बाय ८० आकाराची रांगोळी यापासूनही काढली होती केवळ दोन तास वेळेमध्ये संस्कार भारतीच्या कलाकारांनीही रांगोळी रेखाटली . यावेळी प्रदेश लोककला विभाग प्रमुख डॉ. सतीश महामुनी,  पद्माकर मोकाशे , लक्ष्मीकांत सुलाखे, सुधीरण्णा महामुनी, नंदकुमार पोतदार, प्रफुल्लकुमार शेटे, संतोष डोईफोडे, अभिषेक लसणे, सौ. गीता भाभी व्यास, संदीप रोकडे, नीलेश व्यास  यांच्यासह इतर रांगोळी कलावंत उपस्थित होते.

 
Top