उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील आनंदनगर भागातील रहिवाशी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अरुण पंढरीनाथ पवार वय 64 यांचे आज शनिवारी (दि.16) रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर दुपारी 12 वाजता कपीलधार स्मशानभूमीत मोठया शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी तसेच सर्व स्तरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुल, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रुईभर येथील डॉ.आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाषदादा कोळगे यांचे ते म्हेवणे होत.


 
Top