उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

भारतीय बंधूता संघ सोलापूर यांच्या वतीने सन २०२१ चा दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांना जाहीर करण्यात आला होता,तर भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद यांच्या वतीने देखिल गणेश रानबा वाघमारे यांना गौरविण्यात येऊन हा पुरस्कार वितरण सोहळा आज रोजी उस्मानाबाद येथील स्मृती बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. पुरस्काराचे स्वरुप  सन्मानपत्र,भारतीय बंधूता संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविनंद होवाळ यांचे स्व: लिखित भीम पराक्रमी महायोध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक व पुप्षगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

तत्पुर्वी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.  या कार्यक्रमास प्रामुख्याने भारतीय बंधूता संघाचे अध्यक्ष डॉ ‌रविनंद होवाळ,नगरसेवक तथा डिपीडिसी सदस्य सिध्दार्थ बनसोडे,माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश अण्णा उबाळे, सोमनाथ वाघमारे,आदर्श शिक्षक राजेंद्र धावारे सर,भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब बनसोडे,बौध्दाचार्य धनंजय वाघमारे,राम चंदनशिवे,

विद्यानंद बनसोडे,नितिन माने,संजय माळाळे,कुंदन बनसोडे,शशी माने,विशाल घरबुडवे,विष्णु चौधरी,वसंत खुणे, आयुष,अनुष,कार्तिक,बुध्दीसागर अन्य इतर उपस्थित होते. स्मृती बुद्ध विहार समितीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार धनंजय वाघमारे यांनी मानले.

 

 
Top