भूम/ प्रतिनिधी-

एस .बी.आय बँकेचे कॅशीअर विजय खामकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त बँकेच्यावतीने सन्मान करून निरोप दिला . यावेळी विनातक्रार अखंडपणे खातेदारांना सेवा देणारे कर्मचारी म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख शाखाधिकारी लक्ष्मीकांत  कोकणे यांनी केला.

   यावेळी   माजी नगराध्यक्ष विजयसिंहराजे थोरात,  पंचायत समिती माजी उपसभापती धनाजीराजे थोरात, युवा नेते यशवंतराजे थोरात, माजी उपनगराध्यक्ष नारायण बोत्रे,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर खामकर यांचेसह व्यापारी वर्ग , खातेदार प्रशासकीय कर्मचारी आणि बँक कर्मचारी राज शेखर, सतीश मोर, राजीव खोबरागड, संतोष भसाकरे, विवेक रंजन, गौरव सस्ते, वसंत तीर्थे,  बाळासाहेब दौंडकर, तात्यासाहेब फलके, दत्तात्रय जाधव, बी.बी लोखंडे,  ए व्ही जाधव, अंकुश सरपणे, राऊत मेजर,  लेगारे सर ,  हर्णाकल मेजर यांचीही उपस्थिती होती .


 
Top