उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  पंचायत समितीमध्ये उपसभापती पदी प्रदीप शिंदे यांचीनिवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी धारशिवच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रदीप शिंदे यांचा पुष्पहार घालुन तसेच पुष्पगुच्छ देवून पंचायत समिती धाराशिव येथे सत्कार केला.

उस्मानाबाद पंचायत समिती येथे सर्वाधीक मताधीक्याने भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे यांची धाराशीव पंचायत समिती उपसभापती पदी निवड करण्यात आली. या निवडी बद्दल प्रदीप शिंदे यांचा भाजपचे पदाधीकारी तसेच मान्यवरानी सत्कार करुन अभीनंदन केले.  

 या  सत्कारप्रसंगी जिल्हा समनव्यक नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, ओमप्रकाश मगर, नाना वाघ, विनोद गपाट, पं. स. सदस्य संजय लोखंडे, बालाजी गावडे, आशीष नायकल, सुधीर करंजकर, मनोज रणखांब, मोहन साबळे, नंदकुमार माळी, विराट पाटील, बाजीराव पवार, संजय दळवी, विजय हाजगुडे,  महेश चांदणे, प्रवीण पाठक, नामदेव नायकल, प्रवीण पाटील, प्रमोद देशमुख,निहाल काझी, पवन वाघमोडे, अमोल राजेनिंबाळकर,विजय सरडे,विनोद निंबाळकर तसेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.


 
Top