तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस वाहतूक सेवेत २६ आँक्टोबर पासुन १७.१७ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढ महागाई पार्श्वभूमीवर ही रवाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्रामीण भागातील प्रवाशांना बसणार आहे. 

 सुधारीत प्रवास भाडेदर दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ म्हणजेच दि. २५  व २६ ऑक्टोबर २०२१ च्या मधील मध्यरात्रीपासून महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे .   ज्या प्रवाशांचा दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी प्रवास सुरु होऊन तो दि. २६ ऑक्टोबर , २०२१ ला किंवा तद्नंतर संपत आहे अशा प्रवाशांकडुन जूने व सुधारीत प्रवास भाडे फरकाची रक्कम वसुल करण्यांत येऊ नये, असे जीआर मे नमुद करण्यात आले आहे. 

 
Top