उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून डॉ. पद्मसिंह पाटील विद्या मंदिरामध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाच्या चौथ्या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम डॉ.पद्मसिंह पाटील विद्या मंदिरामध्ये गेल्या दोन महिन्यापासून राबवली जात आहे. वासुदेव गल्ली,लमाण तांडा,उंबरे कोठा,बोंबले हनुमान मंदिर परिसरातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून   दिनांक २५ ऑक्टोबरला शाळेमध्ये लसीकरणाचा चौथा कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य विभागाचे कर्मचारी जी.एम.वडतीले, लोखंडे यांच्यासह अशा कार्यकर्ते भाग्यश्री उंबरे, शुभांगी शिर्शिकर,आत्तार यांनी या भागातील नागरिकांना पहिला आणि पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसरा लसीकरणाचा डोस दिला. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पांडुरंग लाटे म्हणाले की,आता यापुढच्या टप्प्यामध्ये घरोघरी जाऊन माहिती घेऊन लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांनीही आपल्यासह परिवारातील सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे असे त्यांनी आवाहन केले आहे.


 
Top