उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली आहे, अतिवृष्टी अनुदान व पीक विमा कधी मिळणार यात शेतकरी चिंतीत आहे. अधिच उसनवारी करून खरीपातील पेरणी केली होती ते पीक अतिवृष्टीमुळे गेले शेतकरी शासकीय मदतीची अपेक्षा आहे त्यातच दिवाळी सण व नंतर येणारी रब्बी ची पेरणी यात शेतकरी पुरता चिंतीत झाला आहे त्यामुळे बळीराजा समोर संकटांची मालिकाच उभी राहिलेली आहे.खरिपाच्या सुरुवातीला सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे शेतकरी अगोदरच नैराश्याच्या भावनेत होते, त्यातून कसेबसे सावरत आहे तोच आता हाता-तोंडाशी आलेल्या पीकालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे व पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.यासंदर्भात शिवार हेल्पलाइनने मदतीचा हात पुढे केला आहे.

मागील चार वर्षापासून शिवार हेल्पलाइनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फाउंंडेशन ही संस्था काम करत आहे, शेतकऱ्याला जर कोणत्याही प्रकारचा ताण जाणवल्यास नुकसान झालेले असल्यास शिवार हेल्पलाइन ८९५५७७१११५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे. काही तांत्रिक अडचणी येत असल्यास पीक विमा कंपनीशी समन्वय साधून योग्य मार्गदर्शन व सल्ला ही देण्यात येईल.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी मदत केंद्राद्वारे मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी यांच्यासह इतरांचे सहकार्य मिळत आहे.


 
Top