उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तेरखेडा शिवारात चालत्या ट्रकमधून चोरट्यांनी ६० हजार ७६२ रुपयांची तुप व तेलाची खोकी लंपास केली. हा प्रकार रविवारी रात्री ११.४० वाजता घडला. जयसिंगपुरहून जालन्याला जाणाऱ्या ट्रकच्या (क्र. एमएच ०९, ईएम ७३३०) मागील हौदावरील ताडपत्री फाडून चोरट्यांनी ८ तुपाची खोकी, २ खाद्यतेलाची खोकी असा एकुण ६० हजार ७६० किंमतीचा माल चोरुन नेला.


 
Top