उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री सिध्दीविनायक मल्टिस्टेटचा दहावा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मोबाइल बँकिंग सेवेचे अनावरण करण्यात आले.

शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अभय शहापूरकर यांच्या हस्ते सेवेचे अनावरण झाले तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.राजेंद्र धाराशिवकर, अॅड. रामचंद्र गरड, विष्णुदास सारडा, लक्ष्मीकांत जाधव, सुधीर सस्ते, डॉ. सुधीर शिंदे, डॉ.मनोज देव्हारे, गिरीश हंबीरे, मनोज कोचेटा, नितीन भोसले, प्रा. गजानन गवळी, प्रवीण प्रजापती (सीए), व्यंकटेश कोरे, सतीश सोमाणी, विशाल रोचकरी आदी मान्यवर व श्री सिध्दीविनायक मल्टिस्टेटचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी संस्थेची एकूण कार्यपद्धती मांडली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अभय शहापूरकर यांनी संस्थेच्या या नूतन मोबाइल बँकिंग सेवेचा सर्व सभासदांनी या सेवेचा लाभ घेतला पाहिजे. ज्यामुळे आपला वेळ वाचेल व ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले. तसेच संस्थेच्या एकूण वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रतीक देवळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन मिनियार यांनी व्यक्त केले.

श्री सिध्दीविनायक बँकेच्या मोबाइल बँकिंग सेवेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 
Top