वाशी / प्रतिनिधी : - 

 उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकराव गडाख हे पारगाव येथील मांजरा नदीवरील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी आलेले असताना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले.

यावेळी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य सौ सविता तळेकर यांच्या लेटर पॅड वर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विकास तळेकर यांनी पारगाव ते जनकापुर हा अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता तसेच पारगाव ते गिरवली रोड वरील वाहून गेलेला पूल तात्काळ नवीन करावा अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री यांना दिले तसेच. पारगाव महसूल मंडळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने केलेले नाहीत,सप्टेंबर महिन्यामध्ये विमा कंपनीचा कर्मचाऱ्यांनी पारगाव महसूल मंडळांमध्ये पंचनामे केलेले आहेत यावरून केवळ 20 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे,परंतु सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये चार वेळेस पारगाव महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे तरीही याचे पंचनामे केलेले नाहीत वाशी व तेरखेडा महसूल मंडळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आहेत.केवळ पारगाव महसूल मंडळांमध्ये सप्टेंबर महिन्याचे पंचनामे ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे तालुक्या मध्ये सर्वात जास्त नुकसान पारगाव महसूल मंडळाचे झालेले असतानाही त्या महसूल मंडळाची कमी टक्केवारी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे.त्यामुळे वाशी व तेरखेडा महसूल मंडळ या प्रमाणेच पारगाव महसूल मंडळाची ही 80 टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे करून इतर महसूल मंडळ प्रमाणे पारगाव महसूल मंडळाला ही मदत मिळवून द्यावी अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री शंकराव गडाख  यांना दिले.यावेळी तात्काळ पालकमंत्री गडाख यांनी जिल्हाधिकारी यांना संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्याचे सांगितले.

 यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,उपविभागीय अधिकारी अहिल्या गाटाळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी यम रमेश,नायब तहसीलदार वृषाली केसकर,माजी नगराध्यक्ष नागनाथ नायकवडी,शिवसेना उपतालुका प्रमुख विकास तळेकर,जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख कनिफ कानतोडे,वाशी चे गटविकास अधिकारी राजगुरू, विस्तारअधिकारी माचवे,पत्रकार बंडू मुळे,तानाजी कोकाटे, रामदास खारतोडे,राजा कोळी, महेश गिराम,तसेच सर्व खात्याचे खाते प्रमुख शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते

 
Top