उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग क्रमांक ७ तांबरी विभागात काही गाव पुढाऱ्यांनी मोठया प्रमाणात बोगस मतदान नोंदणी केल्यामुळे प्रविण पवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे . 

या निवेदनात असे म्हटले आहे की उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग क्र. ७ तांबरी विभागातील काही गाव पुढान्यांनी मोठया प्रमाणात ग्रामीण भागातील व बाहेर जिल्हयातील नागरिकांची बी.एल.ओ. शी संगणमत करुन मतदान नोंदणी केल्याची बाब माझ्या निर्देशनास आली आहे.तेव्हा उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग क्रमांक ७ तांबरी विभागात केलेल्या व नव्याने होत असलेल्या बोगस मतदान नोंदणीची उच्चस्तरीय चौकशी प्रस्तावित करुन चौकशीअंती संबंधीत बोगस मतदारांवर कायदेशिर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर प्रविण पवार यांची स्वाक्षरी आहे


 
Top