उस्मानाबाद / प्रतिनिधी-

निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी ७० हजार लाचेची मागणी करणाऱ्या येरमाळा पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश मुंढे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीस पाटील हा  मध्यस्थी आहे. दरम्यान गणेश मुंडे व पोलीस पाटील यांच्यावर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे 2१ ऑगस्ट 2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारन्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.

आरोपी यांची लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज रोजी त्यांच्या विरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बुधवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री उशीरापर्यंत चालू होती.

सदरची कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.लाचेसंबंधी तक्रार असल्यास प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्याकडे मोबाइल क्र.95279 43100 ,कार्यालय क्र.02472 222879 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.



 
Top