उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निकषाच्या बाहेर जाऊन पारंपरिक मदतीच्या सीमा तोडून मदत जाहीर केल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अामदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारचे अाभार मानले अाहेत. तसेच केंद्राने अद्यापही मदत न जाहीर केल्याबद्दल सवाल उपस्थित केला असून, कर्तव्यदक्ष विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत आपले वजन वापरावे व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.दरम्यान, फडणवीस यांच्याप्रमाणे राज्याने मदत न केल्याची भावना भाजप अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली अाहे.

अामदार कैलास पाटील यांनी म्हटले अाहे की, मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले.त्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी आग्रही मागणी सर्वांनीच केली होती. सरकारने सहानुभुतीपुर्वक विचार करुन मदतीची घोषणा बुधवारी केली. राज्य सरकारने मदत द्यावी यासाठी श्री. फडणवीस यांनी ज्याप्रकारे पाठपुरावा केला.

अगदी त्याच तडफेने आता केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.भाजपचे राज्याचे नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. आपले पंतप्रधान व देशाच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांमध्ये चांगले वजन आम्ही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्याने पिकविमा हप्त्यापोटी रक्कम जमा केली असून, केंद्राने अद्याप हा हप्ता जमा केलेला नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी यांना हप्ता भरण्याचीही आठवण करून द्यावी अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली अाहे.


 
Top