उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांचे मारेकरी भाजप सरकार विरोधात व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर केलल्या अटकेचा निषेध जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्या वतीने कळंब येथील उपविभागीय दंड अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आला. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,   देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे,  लखीमपुर खेरी येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे व काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी लखिंमपुर खेरी येथील शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांची अडवणूक केली त्यांच्याशीही पोलिसांनी गैरवर्तन केले व शेवटी बेकायदेशीर केलेल्या अटकेचा निषेध करून प्रियंका गांधी यांना सोडा नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करू जिल्हास्तर तालुकास्तरातून व जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उस्मानाबाद च्या वतीने भाजप व उत्तर प्रदेश योगी सरकारचा विरोधात जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई सपाटे,  तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार,  महिला तालुकाध्यक्ष अंजली ढवळे, वैशाली धावारे, संगीता पांचाळ, भागवत राव धस,  शहाजी रितापुरे, नासर शेख, कमलाकर पाटील,  सारिका कापसे, वनमाला पांचभाई , जोशी ता,  कसबे ताई, वर्षा बांगर,   नितीन पांघरते,  किरण मेंडके,  बालाजी पवार आदींची उपस्थिती होती. 


 
Top