काटी / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शुक्रवार दि. 15 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर सावरगाव भागातील शेतकऱ्यांनी तुळजाभवानी ग्रेप्स कंपनी लि.या संस्थेची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्थापना करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, तुळजापुर तालुक्याच्या उजाड कुसळ्या माळरानावर उत्पादीत होणारी द्राक्षे परदेशात निर्यात होवुन योग्य भाव मिळविण्यासाठी शेतकरी संघटन होणे गरजेचे असून त्या माघ्यमातुन  शेतकरी ते ग्राहक असा माल विकला जात नाही तो पर्यत  योग्य भाव मिळत नाही हवामान बदलाप्रमाणे पिकाचे नियोजन करून निर्यातक्षम मालाचे उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी शेतकरी मेळाव्यात केले. 

  सावरगांव येथे दसऱ्याचे औचित्य साधुन १० हजार शेतकऱ्याना संघटीत करुन केन्द्र सरकार, नाबार्ड व ,वॉटर शेड यांच्या माध्यमातुन तुळजाभवानी द्राक्ष उत्पादक कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या निमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, नाबार्डचे कपील गिते, वॉटर शेडचे संदीप जाधव जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर, तालुका कृषी अधिकारी संजय जाधव, द्राक्ष  संघाचे संचालक महादेव वडणे,  कृषी भुषण पुरस्कार प्राप्त द्राक्ष बागायतदार  त्रिबंक (भाऊ) फंड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष सतोष बोबडे,  जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती  होती. पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील  म्हणाले की तालुकाभर माळरान जमीन ही फळबागासाठी उपयुक्त आहे तिथे उत्पादित होणारी द्राक्षे परदेशात निर्यात होवुन सर्व बागायतदाराना सर्वसमावेशक भाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी संघटन महत्वाचे असुन उत्पादक शेतकरी कंपनीची स्थापना झाली हे भागातील शेतकऱ्यासाठी आदर्शवत बाब असून या संघटनेच्या माध्यमातून सर्व बागायतदारांनी लाभ  घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

  यावेळी कृषी भूषण पुरस्कार प्राप्त द्राक्ष बागायतदार त्रिंबक (भाऊ) फंड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या काळात उत्पादन खर्च वाढलेला आहे, या स्पर्धेत माल पिकविण्यापेक्षा मालाला भाव मिळविणे हि सुद्धा काळाची गरज आहे. केंद्र शासन इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील शेतकऱ्यांना अत्यल्प म्हणजे 2 ते 3 सबसिडी देते तर इतर देशात 70 ते 90 टक्क्यांपर्यंत सबसिडी देतात. यामध्ये बदल करणे अपेक्षित असून शासनाने निर्यातबंदी धोरण उठवून  शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून द्यावे ही अपेक्षा व्यक्त करुन शेतकऱ्यांनी जागतिक बाजारपेठेत उतरायचे असेल तर  मालाची गुणवत्ता व संख्या वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

 या शेतकरी मेळाव्यास वॉटरचे क्रांतीलाल गिते, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, नेताजी फंड, विनायक फंड भाऊ माळी समीरा पठाण गणेश फंड पढंरी डोके, रोहित पाटील, किरण औटे नवनाथ मुंड अमोल काशीद सुदर्शन जाधव, काटीचे सरपंच आदेश कोळी, राजाभाऊ मोटे, अरविद भडगे,नरसिंग धावणे, मनोज धावणे, अशोक माळी, बाबा पाटील, संजय फंड,नाबाजी ढगे,  सुधीर मगर,संचालक सुवर्णा पाटील, सुवर्णा फंड, सुवर्णा मगर, निलेश पाटील, शंकर शिंदे, यांच्यासह भागातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य राजकुमार पाटील सुत्रसंचालन विजय सुर्यवंशी तर आभार रोहित पाटील यानी आभार मानले.


 
Top