उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखिल भारतीय मुस्लिम युवा संघटना व अखिल भारतीय चर्मकार संघटना यांचे वतीने शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी नुतन अध्यक्ष श्री शशिकांत खुने यांचा सत्कार श्री. नितीन शेरखाने ( प्रदेशाध्यक्ष चर्मकार संघटना) यांचे हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. 

नुतन उपाध्यक्ष श्री धर्मराज सुर्यवंशी यांचा सत्कार श्री. अमरभाई शेख ( संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय मुस्लिम युवा संघटना) यांचे हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला. तसेच समितीचे नुतन सचिव श्री दत्तात्रय साळुंके यांचा सत्कार श्री. मेहमूद शेख यांनी फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन श्रीफळ देऊन आदर सत्कार करण्यात आला.समितीचे नुतन कोषाध्यक्ष श्री सुनिल मिसाळ, मिडीया प्रमुख श्री दत्ता जावळे, संतोष घोरपडे,धनंजय साळुंके यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी वसीम पठाण ( अध्यक्ष यशवंत सेना, खराडी पुणे)  नितीन बप्पा शेरखाने, अमरभाई शेख, महमूद शेख,अनिल तात्या शेरखाने,साजीद मुलानी, शमशोद्दीन कुरेशी,अस्लम शेख,सादिक मुजावर, हमिदभाई शेख,कुत्बुद्दीन पठाण,अय्याज खान,किरण बाकले,,रणजित उकीरडे,वैभव राऊत इ.मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top