उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रॅन्डम पध्दतीने रविवारी (दि.१७) पंचनामे करण्यात आले. शासनासह विमा प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावून प्रत्यक्षात पंचनामे केले.

सारोळा शिवारात सरपंच प्रशांत रणदिवे, युवा नेते सावन देवगिरे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर देवगिरे, पोलीस पाटील प्रीतम कुदळे, सत्यवान काकडे यांनी स्वत: शेतात जावून पंचनामे करून घेतले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बिराजदार, तालुका कृषी अधिकारी जाधव, मंडल कृषी अधिकारी देशमुख यांनी भेट देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 
Top