तेर / प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील  यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी भेट घेऊन  राज्यात महिला व बालिका  यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या संदर्भात काही उपाययोजना करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली.  

दिलेलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, राज्यांमध्ये बाल न्यायालय अस्तित्वात आली पाहिजे,  दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी,  पीडित बालिकेला व महिलेला एक प्रोटेक्शन ऑफिसर नेमणूक करण्यात यावी ,अल्पवयीन पीडित बालिकांच्या संपूर्ण शिक्षण व नोकरी याची जबाबदारी राज्य सरकारने व केंद्र सरकारने घ्यावी,अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वलसे-पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केली आहे.

यावेळी केंद्राच्या माजी समुपदेशक राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली अॅड. अंजली साळवे  उपस्थित होत्या. 

 
Top