तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील  अश्विनशुध्द १ शके १९४३ गुरूवार दि. १४ महानवमी दिनी दुपारी १२ वाजता  होमकुंडावर  अजाबळी विधी करण्यात आल्यानंतर . देवी गाभाऱ्यातील घटोत्थापन करण्यात आले.

 गुरुवार पहाटे  चरणतीर्थ होऊन धर्मदर्शनास सुरुवात झाली . सकाळी ६ वाजता देविजीस दुग्धअभिषेक होऊन   देवीजीस वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर नित्योपचार पूजा करण्यात येवुन  दुपारी १२ वाजता होमकुंडावर  तुळजापूर तहसील कर्मचारी जीवन वाघमारे यांच्या हस्ते होमकुंडावर धार्मिक विधी करण्यात आला व नंतर मंदिराच्या गाभाऱ्यातील घटोत्थापन महंत वाकोजीबुवा, गुरु तुकोजीबुवा , हमरोजीबुवा, गुरुचिलोजीबुवा,  पाळीचे भोपेपुजारी प्रशांत संभाजी पाटील, उपविभागीय अधिकारी योगेश खारमाटे, प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार योगिता कोल्हे, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुलेसह  मानकरी  भोपे ,पुजारी  यांच्या उपस्थितीत करण्यात आले. नंतर अजाबली विधी करणारे जीवन वाघमारे यांचा मानपान देवुन सन्मान करण्यात आला. गुरुवारी नवव्या माळेदिनी श्री तुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री नगरहुन येणाऱ्या पलंग पालखीचे शहरात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पुजन करुन स्वागत केले.

 
Top