परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालतील एम एस सी वनस्पतीशास्त्र विषयाची विद्यार्थिनी स्नेहल सुधाकर कोकाटे हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये  महाविद्यालयातून ९१ टक्के पेक्षा जास्त गुण सह ओ ग्रेड घेऊन सर्वप्रथम आली आहे.

   त्याचबरोबर उच्च शिक्षणाचा मूळ हेतू संशोधन असल्याने संशोधनासाठी प्रकल्प दिला होता तिने तो पूर्ण केला आहे याचबरोबर तिने आंतरराष्ट्रीय बायो इन्फोटेक या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल मध्ये हाडजोडी या वनस्पतीच्या मुळांमध्ये मायकोरायझा नावाची बुरशी यावर संशोधन करून संशोधन पेपर प्रकाशित केला. संशोधन पेपर प्रकाशित करण्यासाठी व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ प्रकाश सरवदे यांचे मार्गदर्शन लाभले.स्नेहल कोकाटे हिला मिळालेल्या यशाबद्दल  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी स्नेहल कोकाटे सह तिच्या आई-वडिलांचा पुष्प गुच्छ देऊन महाविद्यालयांमध्ये सत्कार केला. यावेळी वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, डॉ. सचिन चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागामार्फत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 
Top