तुळजापूर / प्रतिनिधी- 

 नवराञोत्सवाच्या  आठव्या माळे दिवशी तुळजापूर  खुर्द येथील सर्व महिलांनी तुळजाभवानी देवीची महाआरती करून जगातील कोरणा रोगाचे निर्मूलन होऊ दे व शेतकऱ्यांची ईडा पिडा टळुदे आणि त्यांना चांगले दिवस येऊ दे अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली.

 या कार्यक्रमासाठी साक्षी बेलुरे व तिच्या मैत्रिणींनी सुरेख अशी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.यावेळी शरद जगदाळे,शाम भोजने,प्रमोद भोजने, हनुमंत साबळे,पांडू साबळे, प्रा.संतोष एकदंते,औदुंबर भोजने,रंगनाथ भोजने,मंगेश कुंभार,ओम जगदाळे तसेच सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top