वाशी / प्रतिनिधी- 

 तालुक्यातील पारा येथील श्री.साई बहुद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था पारा यांच्या वतीने गावात मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले .सदरील शिबिरात १००  रुग्णांची  मशीनद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली तसेच ३४ पेशंटला जागेवरच चष्मे तयार करून देण्यात आले आणि शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांची नावे नोंदवण्यात आली.

सदर शिबिरात डॉ.व्यंकटेश बोगा ,प्रियंका सावंत ,राहुल कोठाडिया ,कृष्णा श्रीमाल  व इतर टीम चे सहकार्य लाभले.सदर शिबिरासाठी पारा गावचे सरपंच राजेंद्र काशीद ,उपसरपंच अतुल चौधरी यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते .


 
Top