वाशी / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे . या कार्यकारिणीमध्ये जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवमती बाबई उर्फ सुजाता चव्हाण , जिल्हाध्यक्ष शिवमति किरण निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाकार्याध्यक्षा म्हणून वाशी येथील शिवमति नसरीन अहमद बागवान यांची तसेच जिजाऊ ब्रिगेड वाशी तालुकाध्यक्ष शिवमति चित्रा दतात्रय शिंदे , तालुका उपाध्यक्ष शिवमति अश्विनी संजय जगताप यांची निवड करण्यात आली आहे . 

यावेळी शिवमती सुजाता चव्हाण , शिवमती किरण निंबाळकर , शिवमती अनिता तोडकर , शिवमती नाजमीन शेख , शिवमती वैजंती भोगरगे आदी महिला उपस्थित होत्या .सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


 
Top