तुळजापूर / प्रतिनिधी- 

देशात अशांततेचे असणारे वातावरण शांततेचे होवु दे व ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार अर्थिक मदत करणार आहेच. शेतकऱ्यांना  देवीनै  धीर यावा, असे साकडे राज्याचे पाणीपुरवठा मंञी संजय बनसोडे यांनी शुक्रवार दि.८रोजी  देवीदर्शन नंतर मंदीरात पञकारांशी बोलताना सांगितले .

यावेळी बोलताना बनसोडे पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रातील मंदीरे उघडल्यानंतरच आमच्या मंञ्यांनी दर्शन घेतले. यावेळी आम्ही सर्व देवदेवतांना कोरोना लवकर आटोक्यात येवु दे, तिसरी लाट येवु देवु नको असे साकडे घातल्याचे स्पष्ट करुन भक्तांनी सोशल डिस्टंस पाळुन, सँनिटायझर वापर करुन मास्क घालुनच देविदर्शन घ्यावे व तिसरी लाट येवु देवु नये, असे साकडे घातल्याचे सांगितले .

 
Top