परंडा / प्रतिनिधी : 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा येथे उपजिल्हा रुग्णालय परांडा, रेड रिबन क्लब आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणिशास्त्र विभागांमध्ये लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.  

या लसीकरण शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलोफर पठाण आणि डॉ.आब्रार पठाण हे उपस्थित होते .तसेच टेक्निशियन  अमोल वांबुरकर, करपे तर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सचिन चव्हाण प्रा.सचिन साबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, डॉ.अक्षय घुमरे, डॉ. अतुल हुंबे ,प्रा.जगन्नाथ माळी, . प्रा.अमर गोरे पाटील ,डॉ विद्याधर नलवडे आधी प्राध्यापक उपस्थित होते .यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ . अब्रार पठाण यांनी लसीकरण कसे महत्त्वाचे आहे हे पटवून देत असताना कोरोना ची तिसरी लाट थांबविण्यासाठी, कोरोना या महाभयंकर रोगाची माहिती आपल्या कुटुंबासमवेत समजावून सांगण्यासाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असल्याने विद्यार्थ्या मार्फत देशाचे भवितव्य घडवू शकतो असा विश्‍वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. देशाच्या हिताचे काम हे महाविद्यालय करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आम्ही महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना  विभागाच्या माध्यमातून लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा यांनी सहकार्य केले .लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी एकही लस घेतलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही महाविद्यालयांमध्ये लस आपल्या माध्यमातून देत आहोत. संत गाडगेबाबा महाविद्यालय आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा गे शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण 50 विद्यार्थ्यांनी कोविशील्ड  ही लस घेतली आहे.अनेक विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिंन व कोविशिल्ड ही अगोदरच लस घेतल्याने केवळ 50 विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली आहे .या महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा सतत सहभाग असल्याने रुग्णालयाचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा.सचिन साबळे यांनी मानले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने covid-19 चे पालन करत मास्क व सॅनिटायझर सह उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.


 
Top