तुळजापूर / प्रतिनिधी-

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दीर्घकाळ बंद राहिल्याने तुळजापुरातील हजारो कुटूंबियांच्या हाल-अपेष्टा झाल्या. त्यानंतर अतिवृष्टीचे संकट कोसळले. त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आणि दिवाळी साजरी करायची चिंता दिसू लागली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या पार्श्वभ्ूमीवर त्यांच्या वाढदिवसाला हारतुऱ्यांना फाटा देत गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले. तुळजापुरातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत तब्बल चार हजार कुटुंबियांना दिवाळी साहित्य व फराळाची भेट देत त्यांच्या कुटूंबांत आनंदाचे दीप लावले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा ३० ऑक्टोबर रोजी वाढदिवस असून, यावेळी विविध रुपाने आलेल्या आपत्तीने शेतकरी, व्यवसायिक व अन्य सामान्यजन अडचणीत असल्याने त्यांनी वाढदिवस हारतुऱ्यांनी साजरा करण्याऐवजी तो गरजूंना मदत देऊन करण्याचे निश्चित केले. तसे आवाहनही त्यांनी हितचिंतकांना केले होते. त्यास प्रतिसाद देऊन प्रियंका विजयकुमार गंगणे, अनिता सज्जनराव साळुंके, नरेश अमृतराव, औदुंबर कदम, माऊली भोसले, किशोर साठे, विजय गंगणे, चंद्रकांत कणे, मनोज गवळी, अर्चनाताई गंगणे, संध्या आण्णासाहेब कणे यांनी पुढाकार घेत शुक्रवारी तब्बल ४ हजार गरजू कुटूंबियांना दिवाळीत लागणारे साहित्य व फराळ आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते वाटप केले.यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, नागेश नाईक, राजामामा भोसले, सुहास साळुंके, शिवाजीराव भोसले, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, प्रकाश मगर, विशाल छत्रे, प्रिया गंगणे, हेमाताई कदम, शारदा भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top