तुळजापूर / प्रतिनिधी

तुळजापूर तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत समाविष्ट करून तुळजापुर शहराला केंद्रीय स्थळाचे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ करण्याच्या मागणी चे निवेदन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी करजखेडा पाटी येथे सोमवार दि.४ रोजी दिले .

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे.  इथे सर्वसाधारण दिवसात ४० ते ५० हजार भाविक दर्शन घेतात तर मंगळवार , शुक्रवार  सुट्टी तसेच नवरात्र काळात ही संख्या लाखाच्या वर जाते या शहराला ऐतिहासिक महत्व आहे . देशाच्या कानाकोपन्यातुन एवढे भाविक येत असतानाही किंवा पौराणिक दृष्ट्या अन्य साधारण महत्त्व असतानाही इथे शिर्डी शेगाव किंवा इतर देवस्थानच्या तुलनेत अनेक बाबींचा अभाव आहे जसे की मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , भाविकासाठी नव्य सुसज्ज भक्तनिवास , भाविकांनी दर्शनानंतर शहरात थांबावे असे कुठलेही विकसित प्रेक्षणीय स्थळ नाही,  मोठी बाजारपेठ नाही , युवकांना कुठलेही कामाचे साधन नाही, इथे एमआयडीसी नसल्याने कुठलेही उद्योग नाहीत , शहराच्या चारही बाजूने धुळे , नागपूर , पुणे , हैदराबाद अशा मेट्रो सिटी ला जाणारे महामार्ग असूनही कुठलीही औद्योगिक क्रांती होताना दिसत नाही , शहराच्या आजूबाजूला अनेक देवस्थाने आहेत जे विकसित झाल्यास पर्यटनास चालना मिळू शकते ,  देशाचे गृहमंत्री मा.श्री अमित भाई शहा हे तुळजापूरला आले होते. त्यांनी  त्यावेळी  तुळजापूर हे जागतिक स्थान वैश्विक स्तराचे पर्यटन स्थळ करू, अशी घोषणा केली होती , तरी आपण श्री तुळजाभवानीच्या तुळजापूर तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत समाविष्ट करून तुळजापुरला केंद्रीय स्थळाने तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ करावे व येथील सर्वांगीण विकास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top