तुळजापूर / प्रतिनिधी

 काक्रंबा येथील  शेतकऱ्यांनी  विमा कंपनीचे प्रतिनिधी  पिकाची चुकीची  माहीती भरत असल्याची तक्रार करुन चुकीचे पंचनामे दुरुस्ती  करण्याची करण्याची मागणी,  खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे केली होती.  या आनुषंगाने विमा प्रतिनिधीनी अखेर  शेतकऱ्यांच्या बांधावर अवतरले व पंचनामे सुरु केला आहे.

 प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाल्याचे दावे विमा कंपनीकडे केले होते. अशा शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले होते परंतु होत असलेल्या पंचनाच्यामध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी चुकीची माहिती भरणे,नुकसानीची टक्केवारी झालेल्या नुकसानी पेक्षा कमी दाखवणे,बाधित क्षेत्र कमी दाखवणे, कोऱ्या पंचनाम्यावर सह्या घेणे असे प्रकार सुरू होते त्याच्याविरुद्ध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. 4 ऑक्टोंबर 2021 रोजी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी  काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले व चुकीचे झालेले पंचनामे दुरुस्त करणे या पुढील होणारे पंचनामे पारदर्शक पद्धतीने करणे व यानंतर काक्रंबा येथील शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहीती चेतन बंडगर,  ईर्शाद शेख या तक्रारदार शेतकऱ्यांनी दिली.

 
Top