तेर / प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.राज्य शासनाने नुकसान भरपाई नाही दिली तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करू असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पहाणी केली.यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ही माहिती दिली.यावेळी विंधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.राणाजगजितसिंह पाटील,आ.सुजितसिंह ठाकूर,आ.अभिमन्यू पवार ,आ.सुरेश धस उपस्थित होते.

मराठवाड्यात २५लाख हेक्टर जमीनीवरील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहे.राज्य शासनाकडून शेतकरी यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती पण कांहीही मदत केली नाही.आमच्या काळात प्रत्येक जिल्ह्याला ८०० कोटी रुपये पिक विमा मिळाला.कांही ठिकाणी तर विमा कंपनी चे कर्मचारी शेतकरी यांच्या कडून रक्कम घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.राज्य शासनाने महसूल विभागाने दिलेल्या अहवालानुसार राज्य शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे.शेतक-याना दस-या पूर्वी नुकसान भरपाई नाही दिली तर सातत्याने यासाठी पाठपुरावा करणार आहोत.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,अॅड.मिलींद पाटील, दत्ता कुलकर्णी, व्यंकट गुंड,रेवणसिद्ध लामतुरे, नितीन पाटील,रोहन देशमुख, लक्ष्मण माने, राजसिंह निंबाळकर,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी,लतिका पेठे ,जोत्सना लोमटे, जुनेद मोमीन, भास्कर माळी, नितीन भोसले आदींची उपस्थिती होती. 

 

 
Top