उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपरी (शि.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयाचा कडी- कोयंडा तोडून चाेरट्याने एलएडी टीव्ही लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुरूवारी (दि.७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत मुलांना ई लर्लिग पद्धतीने शिक्षण मिळण्यासाठी एलएडी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. याच्या माध्यमातून युट्यूबवरील शैक्षणिक व्हीडीओ विद्यार्थ्यांना दाखवले जात होते. मात्र, हा टीव्ही चोरुन नेण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी ई-लर्निंग अभ्यासापासून वंचित राहणार आहेत. शाळा कर्मचारी सुभाष शिंदे यांच्या फिर्यादीवरुन शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top