उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या दोन महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झाली व या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले या नुकसानीची भरपाई व्हावी यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३७ कोटी रुपयांची भरीव मदत महाविकास आघाडी सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली. या मदतीचे वितरण देखील आता सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही

रक्कम दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, ना.शंकरराव गडाख व सह पालकमंत्री ना.संजय बनसोडे यांचे त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले आहेत.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २१७ कोटी रुपयांची मदत देय होती त्यात राज्य शासनाने ९९ कोटी ४६ लाख रुपयांच्या वाढीव निधीची भर घातली. ही मदत जिल्ह्यातील ४ लाख ५५ हजार ४०६ शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. या मदतीचे वितरण तात्काळ सुरुवात देखील झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा शब्द दिला होता तो शब्द देखील महाविकास आघाडी सरकारच्या सर्व मंत्रीमहोदयांनी पाळला याबद्दल त्यांचे उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आभार मानले.


 
Top