तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला असुन याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय केशव पाटील यांनी काढले आहेत.स्ञी महिला  रुग्णाला चुकीची  वैद्यकीय सेवा दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे

या बाबतीत  अधिक . माहीती अशी की, कुतवळ रुग्णालयात 18 वर्षीय प्रतीक्षा प्रकाश पुणेकर या रुग्णांचा उपचार चालु असताना मुत्यु झाला  झाला. चुकीच्या पध्दतीने उपचार केल्याने मुत्यु झाल्याचा आरोप करीत  डॉ  कुतवळ यांच्यावर गुन्हा नोंद करून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करीत कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती त्यानुसार तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती त्यानुसार केलेल्या शिफारशीनुसार परवाना रद्द केला आहे . चौकशी समितीचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे , डॉ आर यु सूर्यवंशी , डॉ ए एस धुमाळ या 3 तज्ञ डॉक्टर यांच्या समितीने कुतवळ हाँस्पीटल मध्ये . प्रतीक्षा पुणेकर हिच्या उपचार दरम्यान तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक होते परंतु तो घेतला नाही . रुग्णाच्या नातेवाईक यांनी पुढील उपचार करिता  विनंती करून सुद्धा रेफर केले नाही . संबंधित रुग्णालयाने मृत्यूचे प्रमाणपत्र दिले नाही तसेच मृत्यूच्या कारणासाठी शवविच्छेदन केले नाही .अ चौकशी समिती व सदस्य यांनी या प्रकरणाचे निरीक्षण केले असता रुग्णाचा मृत्यू हा प्लमोनरी odema मुळे झाला असावा असे नमूद केले आहे .


 
Top