उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून (दि.२५) स्पेशल बस सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी उस्मानाबाद ते सारोळा या मार्गावर ही बस धावणार आहे.

सारोळा येथील बस स्टॉपवर या बससेवेचा चालक व वाहक यांचा प्रताप रणदिवे व बालाजी देवगिरे यांच्या हस्ते सत्कार करून शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांची बसअभावी मोठी गैरसोय सुरू होती. त्यामुळे उस्मानाबाद-सारोळा ही स्पेशल बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी आगारप्रमुख पी. एम. पाटील व स्थानकप्रमुख रामचंद्र शिंदे यांच्याकडे केली होती. अखेर मागणीची तातडीनेे दखल घेऊन विद्यार्थ्यांसाठी उस्मानाबाद-सारोळा ही स्पेशल बस सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी ६ वाजता ही बस येणार आहे. सोमवारी सकाळी या बससेवेचा शुभारंभ करून चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेेेळी चालक गणू कदम, वाहक वरकटे, दत्ता कुंभार, औदुंबर काळे, सतीश रणदिवे, मंजूर शेख, नागेश इसाके, सोपान टिंगरे, ओमप्रकाश गाढवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top